मुंबई - अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दस्साेनी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिमन्यू दसानी आगामी 'मर्द को दर्द नही होता' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'मर्द को दर्द नही होता'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दस्साेनी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिमन्यू दसानी आगामी 'मर्द को दर्द नही होता' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अभिमन्यू या चित्रपटात, अशा व्यक्तीची भूमिका साकारतोय ज्याला कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही. त्याला तसा एक आजारच असतो. कितीही लागले तरी त्याला त्याचा त्रास होत नाही. अभिमन्यूशिवाय चित्रपटात टिव्ही अभिनेत्री राधिका मदन हीदेखील झळकणार आहे. 'पटाखा'नंतर 'मर्द को दर्द नही होता' या चित्रपटात प्रेक्षकांना राधिका मदनला पाहता येणार आहे.
या दोघांव्यतिरीक्त या चित्रपटात गुलशन दिवेह, जिमित त्रिवेदी आणि महेश मांजरेकर यांचीदेखील महत्वाची भूमिका आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सर्वांची खास झलक पाहायला मिळते.
'मर्द को दर्द नही होता' चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रूवाला यांनी केले आहे. या चित्रपटाचे वेगवेगळे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहेत. रॉनी स्क्रूवाला यांची निर्मिती असलेले तीन चित्रपट यावर्षात प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये 'केदारनाथ', 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' आणि 'सोनचिडीयां', या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्यांचा 'मर्द को दर्द नही होता' हा चित्रपट २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे.