पुणे - शिरुर तालुक्यातील रांजणगाव येथे प्रख्यात मराठी सिनेअभिनेत्रीशी तीन दिवसांपूर्वी छेडछाडीचा प्रकार घडला होता. त्यानुसार या अभिनेत्रीने मुंबईतील साकीनाका पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या विनयभंग प्रकरणाचा गुन्हा पुणे ग्रामीण पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
रांजणगावमध्ये कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अश्लील वर्तन, मुंबईत गुन्हा दाखल - अभिनेत्रीसोबत अश्लिल वर्तन, मुंबईत गुन्हा दाखल
मराठीतील एका आघाडीच्या अभिनेत्रीची कार्यक्रमाला आली असता तिच्यासोबत छेडछाड झाल्याची घटना रांजणगाव येथे घडली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात मुंबईतील सकिनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव येथे युवा सेना जिल्हा अध्यक्षाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सिनेअभिनेत्री या प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन तीन जणांनी अभिनेत्रीशी अश्लिल वर्तन केले होते. मात्र यावेळी त्यांना कार्यक्रमात कुठलीही तक्रार केली नाही. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर मुंबई येथील साकीनाका पोलिसांत जाऊन त्यांनी अज्ञात तीन जणांवर साकीनाका पोलिसांनी कलम 354 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी पुणे ग्रामिणच्या हद्दीतील रांजणगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे.
युवासेना जिल्हाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त व्हिडिओ चित्रीकरण तपासुन आरोपींचा शोध घेतला जाणार असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सुरजकुमार राऊत यांनी सांगितले.