महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मनोरंजनसृष्टीतील ‘लाल पऱ्यांनी’ साजरा केला पारंपरिक भोंडला! - नवरात्र उत्सव

कोरोना काळात भेटीगाठी थांबल्या होत्या पण आता हळू हळू परिस्थती पूर्वपदावर येत आहे. नुकताच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री व इतर क्षेत्रातील सख्यांनी मिळून पारंपरिक भोंडला साजरा केला. अभिनेत्री अर्चना नेवरेकर व लीना नांदगावकर यांनी मिळून या भोंडल्याचे आयोजन केले होते. नवरात्रीचे औचित्य साधत या सख्यांनी भोंडला कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

अभिनेत्रींनी साजरा केला भोंडल्याचा सण
अभिनेत्रींनी साजरा केला भोंडल्याचा सण

By

Published : Oct 14, 2021, 5:37 PM IST

नवरात्रीत स्त्रियांना छान नटता थटता येते. या मांगल्य सणात प्रत्येक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने नवरात्र साजरी केली जाते. परंतु प्रत्येक प्रांतातील स्त्रिया अतीव उत्साहाने हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने सण साजरा करताना भोंडला खेळला जातो. आधीची पिढी पुढच्या पिढीला यातील रीति रिवाज शिकवत असते. मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार सुद्धा नवरात्र जोशात आणि जल्लोषात साजरी करतात.

अभिनेत्रींनी साजरा केला भोंडल्याचा सण

कोरोना काळात भेटीगाठी थांबल्या होत्या पण आता हळू हळू परिस्थती पूर्वपदावर येत आहे. नुकताच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री व इतर क्षेत्रातील सख्यांनी मिळून पारंपरिक भोंडला साजरा केला. अभिनेत्री अर्चना नेवरेकर व लीना नांदगावकर यांनी मिळून या भोंडल्याचे आयोजन केले होते. नवरात्रीचे औचित्य साधत या सख्यांनी भोंडला कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

अभिनेत्रींनी साजरा केला भोंडल्याचा सण

या कार्यक्रमाला अर्चना नेवरेकर, लीना नांदगावकर, सुप्रिया पाठारे, शिल्पा नवलकर, नियती राजवाडे, अदिती सारंगधर, वनश्री पांडे, मानसी नाईक, मेघा धाडे, पल्लवी प्रधान, सुलेखा तळवलकर, रोहिणी निनावे, कांचन अधिकारी, नितु जोशी, डॉ पूर्णिमा म्हात्रे, रेखा सहाय, वनिता कुंभारे, सोनल खानोलकर या ‘लाल पऱ्या’ उपस्थित होत्या. सर्वांनी लालचुटुक वेशभूषा केली होती आणि सर्वच जणी उत्साहाने भोंडला खेळल्या.

अभिनेत्रींनी साजरा केला भोंडल्याचा सण

या निमित्ताने नुकतेच लग्न झालेल्या अभिनेत्री मानसी नाईक खरेराचे कौतुक करून ओटी भरण्यात आली. अंधेरी पश्चिम मधील 'नैवेद्य' या महाराष्ट्रीयन रेस्टोरंटमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

हेही वाचा - अभिनेत्री नोरा फतेही 'ईडी' कार्यालयात दाखल, जॅकलीन फर्नांडिस उद्या लावणार हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details