महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात येणार एक सकारात्मक वळण! - Aai Kuthe Kay Karte latest news

‘आई कुठे काय करते’ मधील प्रमुख व्यक्तिरेखांवर होत असलेले जुलमी अत्याचार बघून मालिकेला प्रेक्षकांची सहानुभूती मिळतेय. या मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात एक सकारात्मक वळण येणार आहे. मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी माहिती दिली आहे.

आई कुठे काय करते मालिकेतील प्रसंग
आई कुठे काय करते मालिकेतील प्रसंग

By

Published : Feb 3, 2022, 7:43 PM IST

हिंदीमधील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ ज्याची मराठी आवृत्ती ‘आई कुठे काय करते’ मधील प्रमुख व्यक्तिरेखांवर होत असलेले जुलमी अत्याचार बघून मालिकेला प्रेक्षकांची सहानुभूती मिळतेय. खरंतर, ही मालिका टॉप ५ मध्ये असते आणि प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतलं भावनिक वळण सध्या प्रत्येकाच्याच मनाला चुटपुट लावणारं आहे. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.

आई कुठे काय करते मालिकेतील प्रसंग

आता मालिकेत अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळणार असून ती आशुतोषच्या मदतीने पहिलं गाणं रेकॉर्ड करणार आहे. लवकरच मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात येणारं एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजवर अरुंधतीने आपली स्वप्न, आवडीनिवडी बाजूला सारुन कुटुंबाला सर्वस्व मानलं. गाण्याची आवड असणारी अरुंधती आता मालिकेत पार्श्वगायिका म्हणून समोर येणार आहे.

आई कुठे काय करते मालिकेतील प्रसंग

आशुतोषच्या मदतीने ती तिच्या आयुष्यातलं पहिलं गाणं रेकॉर्ड करणार आहे. मालिकेतला हा गाण्याचा प्रसंग सुरेश वाडकर यांच्या आजिवासन स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. 'मोरपंखी चाहुलींचे, सोबतीने चालणे...अंतरावर पसरलेले, टिपूर से सुखाचे चांदणे...' असे गाण्याचे शब्द असून श्रीपाद जोशींनी ते लिहिलं आहे. सुप्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलं असून गायिका विद्या करलगिकर यांनी गायलं आहे.

मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना मधुराणी म्हणाली, 'खूप छान वाटतं आहे. मला जेव्हा १० वर्षाच्या मोठ्या गॅप नंतर आई कुठे काय करते मालिकेत काम करण्याची संधी मिळाली तीच आनंदाची भावना अरुंधती आता जेव्हा तिचं पाहिलं गाणं रेकॉर्ड करतेय तेव्हा आहे. आजिवासन स्टुडिओ मध्ये येता क्षणीच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १२ वर्षांपूर्वी सुंदर माझं घर सिनेमाचं मी संगीत दिग्दर्शन केलं होतं तेव्हा रोज यायचे. आज या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा योग जुळून आला. मी या वास्तूमध्ये पाय ठेवताच खूप भरून आलं. खूप आठवणी ताज्या झाल्या. आई कुठे काय करते मालिकेत आता अरुंधतीचा नवा प्रवास सुरु होतोय तो कसा असेल हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.'

हेही वाचा -Urfi Javed : उर्फी जावेदची अनोखी ड्रेसिंग स्टाईल

ABOUT THE AUTHOR

...view details