मुंबई -सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मनोरंजनसृष्टी थोडी थंडावली आहे. बहुतेक सर्वच हिंदी चित्रपटांची प्रदर्शनं लांबणीवर पडली आहेत. महाराष्ट्रात शासनाने चित्रपटगृहे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे नजीकच्या काळात बरेच मराठी चित्रपट प्रदर्शित होते आहेत. मुख्य म्हणजे मराठी चित्रपटांना नेहमीची हिंदी चित्रपटांबरोबर करावी लागणारी स्पर्धा नाहीये. मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर अजून एका मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली.
Law of Love : प्रेमाचं वादळ येतंय ४ फेब्रुवारीला! - new marathi serial
प्रेमाचा अर्थ नव्याने उलगडून सांगण्याकरता चित्रपट निर्माते जे. उदय यांचा "लॉ ऑफ लव्ह" (Law of Love) हा सिनेमा व्हॅलेंटाईन महिन्यात ४ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर अनिल नगरकर, रवी कदम, योगेश पवार आणि सचिन मस्के तसेच अभिनेत्री प्राची पालवे यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.
Law of Love