मुंबई -अभिनेत्री कृती सेनॉन आज तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आजवर तिने बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तिच्यासोबत बऱ्याच अभिनेत्यांची नावे देखील जोडली गेली. मात्र, आपण कोणालाही डेट करत नसल्याचा खुलासा कृतीने केला आहे.
बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यामुळे कोणालाही डेट करु शकत नाही कृती, स्वत:च केला खुलासा - अर्जुन पटियाला
कृतीसोबत बऱ्याच अभिनेत्यांची नावे देखील जोडली गेली. मात्र, आपण कोणालाही डेट करत नसल्याचा खुलासा कृतीने केला आहे.
कृती सेनॉन हीने अलिकडेच एका माध्यमाशी बोलताना तिच्या डेटींग लाईफबद्दल संवाद साधला. तिने यावेळी सांगितले, की 'मला वाटले तरी मला वरुण शर्मा कोणालाही डेट करू देणार नाही. कारण, वरुण माझ्याबाबतीत फारच प्रोटेक्टिव्ह आहे. जरी मी कोणाला डेट करत असली, तरी याची माहिती केवळ माझ्या जवळच्या लोकांनाच सांगायला मला आवडेल, असेही ती म्हणाली.
कृतीचा नुकताच 'अर्जुन पटियाला' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, प्रेक्षकांचा या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटात तिच्यासोबत दलजीत दोसांझ आणि वरुण शर्मा हा देखील झळकला आहे. या चित्रपटात दलजीतने पोलिसाची भूमिका साकारली आहे. तर, कृतीने पत्रकाराची भूमिका साकारली आहे.