बिग बॉस सीजन 13 ला राजपूत करणी सेनाने विरोध केला आहे. बिग बॉसच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रतिक्रिया मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बिग बॉसवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी राजपूत करणी सेनेने केला आहे.
'बिस बॉस'मुळे लव्ह जिहादला प्रोत्साहन : राजपूत करणी सेना - Karni Sena latest news
बिग बॉस सिझन १३ हा शो फॅमिलीने एकत्र बसून पाहण्यासारखा नाही. त्यामुळे या शोवर बंदी आणण्याची मागणी महाराष्ट्री राजपूत करणी सेनेने केली आहे.
राजपूत करणी सेना
मागणी पूर्ण न झाल्यास आमच्या स्टाईलने आम्ही हा कार्यक्रम बंद पाडू अशी धमकी राजपूत करणी सेनेने दिलेली आहे. बिग बॉसच्या शोमध्ये वापरण्यात येणारा कंटेण्ट हा भारतीय संस्कृतीला शोभणारा नसून हा कार्यक्रम कौटुंबिक नसल्याचाही राजपूत करणी सेनेचे जीवन सिंह सोलंकी यांनी म्हटलं आहे.