महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'जर मला किंवा 'मणिकर्णिका'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही तर...'

१० दिवसांच्या धार्मिक प्रवासानंतर ती पुन्हा परतली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिने १० दिवस मौनव्रत धारण केले होते. त्यासाठी ती कोईम्बतूर येथे गेली होती आणि परतताच तिने पुन्हा एकदा माध्यमांचे लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे.

बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्येही तिचा समावेश झाला आहे.

By

Published : Mar 24, 2019, 8:22 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या परखड विधानांसाठी प्रसिद्ध आहे. १० दिवसांच्या धार्मिक प्रवासानंतर ती पुन्हा परतली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिने १० दिवस मौनव्रत धारण केले होते. त्यासाठी ती कोईम्बतूर येथे गेली होती आणि परतताच तिने पुन्हा एकदा माध्यमांचे लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे.


कंगना रनौत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे माध्यमांच्या मथळ्यांमध्ये झळकत असते. यावेळी तर तिने चक्क राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याबाबतच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उमटविला आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, 'मणिकर्णिका' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल की नाही, याबाबत कंगनाला तिची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावेळी ती म्हणाली, की 'मला असे वाटते, काही गोष्टी आहेत ज्याचा आपण आदर केला नाही, तर ते त्या संस्थेचा अपमान केल्यासारखा असेल. जर मी किंवा माझा चित्रपट 'मणिकर्णिका' हा राष्ट्रीय पुरस्कारासाठी योग्य ठरला नाही, तर त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. मात्र, जर मी इतर कामांमध्ये चांगली ठरली तर, ते चांगलेच होईल'.


पुढे ती म्हणाली, की 'अंधाधून चित्रपटामध्ये तब्बूंचा अभिनय फारच चांगला होता. त्यांच्या अभिनयाला मी मनापासून दाद देते. त्यांच्याप्रमाणेच मी देखील 'मणिकर्णिका' चित्रपटात चांगले काम केले आहे. येत्या काही वर्षांमध्ये ते सर्वांना समजेलही. 'मणिकर्णिका'पेक्षा माझी भूमिका आणखी चांगली झाली, तर चांगलेच आहे. मात्र असं पुन्हा घडेल, असं मला वाटत नाही'.


कंगना आगामी काळात 'मेंटल है क्या' आणि 'पंगा' चित्रपटात झळकणार आहे. जयललिता यांच्या बायोपिकसाठीही तिची वर्णी लागली आहे. जयललिता यांच्या बायोपिकसाठी तिने तब्बल २४ कोटींचे मानधन घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्येही तिचा समावेश झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details