'कलंक' नही इश्क है.... अरिजीत सिंगच्या आवाजातील टायटल ट्रॅक प्रदर्शित! - कलंक
आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे कारण 'कलंक'चं टायटल ट्रॅक नुकतंच प्रदर्शित झालं आहे. पुन्हा एकदा अरिजीत सिंगच्या आवाजाची दमदार झलक या गाण्यातून पाहायला मिळते.
मुंबई -करण जोहरची निर्मिती असलेल्या 'कलंक' चित्रपटाबद्दल चाहत्यांची दिवसेंदिवस उत्कंठा वाढत चालली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अद्याप प्रदर्शित झाला नाही. मात्र, चित्रपटाचा टीजर आणि दोन गाणी मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळाली. त्यातच अरिजीत सिंगच्या आवाजातील टायटल ट्रॅक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते.
आता चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली आहे कारण 'कलंक'चं टायटल ट्रॅक नुकतंच प्रदर्शित झालं आहे. पुन्हा एकदा अरिजीत सिंगच्या आवाजाची दमदार झलक या गाण्यातून पाहायला मिळते.
आलिया भट्ट आणि वरूण धवन यांची केमेस्ट्री नेहमीप्रमाणे या गाण्यातही बहरताना दिसते. वरूण धवन या चित्रपटात जफरची भूमिका साकरत आहे. तर, आलिया 'रूप' नावाच्या राजकुमारीच्या भूमिकेत दिसणार आहे. आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हाची देखील झलक या गाण्यात पाहायला मिळते.
'कलंक'चे टायटस ट्रॅक २९ मार्चलाच प्रदर्शित होणार होते. त्यामुळे हे गाणे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र, काही कारणास्तव करण जोहरने या गाण्याचे प्रदर्शन पुढे ढकलले होते. अखेर आज हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर, प्रितम यांच्या संगीताची जादु पुन्हा एकदा अनुभवायला मिळते. अभिषेक वर्मन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. 'कलंक' चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.