महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 8, 2019, 9:58 AM IST

ETV Bharat / sitara

'ये काली काली आंखे', काजोलचा धमाकेदार डान्स सोशल मीडियावर व्हायरल

काजोलचा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ फार जुना आहे. मात्र, तो आता व्हायरल होत आहे. 'डान्स दिवाने' या कार्यक्रमाच्या एका भागात काजोलने हजेरी लावली होती.

'ये काली काली आंखे', काजोलचा धमाकेदार डान्स सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री काजोलच्या 'बाजीगर' चित्रपटातील लोकप्रिय 'ये काली काली आंखे' हे गाणे तर सर्वांना माहिती आहे. या गाण्यातील शाहरुख आणि काजोलच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना भूरळ घातली होती. आता पुन्हा या गाण्याची चर्चा होण्यामागचे कारण म्हणजे, काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिची या गाण्यावरील डान्सची झलक पाहायला मिळते.

काजोलचा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ फार जुना आहे. मात्र, तो आता व्हायरल होत आहे. 'डान्स दिवाने' या कार्यक्रमाच्या एका भागात काजोलने हजेरी लावली होती. दरम्यान, तिने या कार्यक्रमाचे परिक्षक तुषार कालिया यांच्यासोबत 'बाजीगर' मधील 'ये काली काली आंखे' या गाण्यावर डान्स केला होता.

काजोलच्या फॅनपेजवरुन इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ५ ऑगस्ट रोजीच काजोलचा वाढदिवस साजरा झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा काजोलच्या डान्सची चाहत्यांना भूरळ पडली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details