महाराष्ट्र

maharashtra

‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे परीक्षक दिसणार अरुणाचल प्रदेशच्या पारंपरिक पोशाखात!

By

Published : Apr 10, 2021, 4:00 PM IST

‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या डान्स शोमध्ये अरुणाचल प्रदेशच्या कोसुमने लोकांकडून खूप अपमान सहन केला आहे हे सांगितल्यावर वातावरण भावाकुल झाले. तेथील लोक आणि चीन मधील लोकांतील दिसण्यात साधर्म्य असल्यामुळे कोसुमची ओळख आणि रूप यावरून त्याला हिडीसफिडीस केले जात असे. अशा या कोसुमच्या आईने शोच्या परीक्षकांसाठी अरुणाचल प्रदेशचा पारंपरिक पोशाख भेट दिलाय. या विकेंडला याच पोशाखात परीक्षक दिसणार आहेत.

'Super Dancer Chapter 4'
‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ डान्स शो

ऑडिशन फेरीतच सादर झालेल्या अप्रतिम आणि अनोख्या नृत्य प्रतिभेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लहान मुलांचा डान्स रियालिटी शो सुपर डान्सर चॅप्टर ४ छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. आपल्या नृत्य प्रतिभेचे प्रदर्शन करतानाच स्पर्धकांनी आपल्या व्यक्तीगत पण प्रेरणादायक गोष्टी देखील सांगितल्या ज्या प्रेक्षकांच्या हृदयाला भिडल्या आहेत. अरुणाचल प्रदेशच्या कोसुमने लोकांकडून खूप अपमान सहन केला आहे हे सांगितल्यावर वातावरण भावाकुल झाले.

‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ डान्स शो

तेथील लोक आणि चीन मधील लोकांतील दिसण्यात साधर्म्य असल्यामुळे कोसुमची ओळख आणि रूप यावरून त्याला हिडीसफिडीस केले जात असे. पूर्वी लोक त्याला याबद्दल हिणवत असत आणि तो त्यांना हे सांगून सांगून थकून गेला होता, की तो देखील याच देशाचा नागरिक आहे. परंतु, कोसुमने सुपर डान्सरची ऑडिशन दिल्यावर मात्र चित्र एकदम पालटले. अनेक लोकांनी त्यांचा संपर्क साधून त्याच्याबद्दल सहानुभूती आणि काळजी व्यक्त केली. कोसुमने देखील सांगितले की, त्याची शोमधल्या इतर स्पर्धकांशी मैत्री झाली आहे आणि इथे त्याला घरच्यासारखे वाटते आहे.

या वीकएंडला मेगा ऑडिशनमध्ये कोसुमच्या आईने सर्व परीक्षकांना खास पोशाख भेट दिला. अरुणाचल प्रदेशहून आलेल्या कोसुमच्या आईने अरुणाचल प्रदेशचा पारंपरिक पोशाख, कमरेभोवती लपेटलेला स्कर्ट, पारंपरिक पगडी आणि इतर दागिने इत्यादी तिन्ही जजेसना दिला. शिल्पा शेट्टी कुंद्रा, गीता कपूर आणि अनुराग बसू या तिन्ही परीक्षकांनी उत्साहाने तो पोशाख परिधान केला. शिल्पा आणि गीता या सुंदर पोषाखात मोहक दिसल्या.

शिल्पा शेट्टी कुंद्रा म्हणाली, “अरुणाचल प्रदेश हे राज्य वैविध्यपूर्ण सामाजिक संस्कृतींनी आणि सुंदर हँडलूम्सनी सुशोभित झाले आहे. या हस्तकलांमधील कला आणि बारकाई यातून त्या पोषाखांची गुणवत्ता दिसून येते. आम्हाला हे सुंदर पोशाख विचारपूर्वक भेट दिल्याबद्दल मी कोसुम आणि त्याच्या आईची आभारी आहे. मला या पोषाखात स्वतःला बघून आनंदित व्हायला झालाय.”

खास आपल्यासाठी कोसुमच्या आईने पोशाख आणला आहे हे समजल्यावर गीता कपूर खूप आनंदली. आपली भावना व्यक्त करताना ती म्हणाली, “मला वेगवेगळे पोशाख परिधान करायला आवडतात. अरुणाचल प्रदेशचा पारंपरिक पोशाख अगदी अनोखा आणि मोहक आहे. यातून त्या प्रदेशाची सदभिरुची आणि अलंकारांचे प्रेम व्यक्त होते. कोसुमच्या आईने माझी इच्छा पूर्ण केली!” परीक्षकांना पारंपरिक पोषाखात पाहून सेटवरील सर्वचजण आनंदित झाले होते.

‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो.

हेही वाचा - आमिर खानची मुलगी इरा करतेय मराठमोळ्या नुपुर शिखरेशी डेटिंग

ABOUT THE AUTHOR

...view details