मुंबई - दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि जया प्रदा यांच्या जोडीने एकेकाळी बॉलिवूडचे अनेक चित्रपट गाजवले. या दोघांनी तब्बल २० चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या आहेत. आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहे.
जितेंद्र-जया प्रदाची जोडी पुन्हा झळकणार एकत्र! - jaya prada
दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि जया प्रदा यांच्या जोडीने एकेकाळी बॉलिवूडचे अनेक चित्रपट गाजवले. या दोघांनी तब्बल २० चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका साकारल्या आहेत. आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहे.
जितेंद्र आणि जया प्रदा यांची जोडी चित्रपटासाठी नाही, तर सोनी वाहिनीवरील 'सुपर डान्सर-३' या रिअॅलिटी शोमध्ये पाहुणे म्हणून एकत्र येणार आहेत. या भागात सुपर डान्सरचे स्पर्धक त्यांच्या सुपरहिट गाण्यांवर डान्स सादर करतील.
'सुपर डान्सर-३' मधील बालस्पर्धकांचा डान्स पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे', असे जया प्रदा यांनी सांगितले. जितेंद्र यांनीही यावेळी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'माझा नातु लक्ष्य हा देखील या सुपरडान्सरप्रमाणे उत्साही आहे', असेही ते यावेळी म्हणाले.