मुंबई - अॅण्ड टीव्हीवरील मालिका 'हप्पू की उलटन पलटन' प्रेक्षकांना डोळ्यांतून अश्रू येईपर्यंत खदखदून हसवत आहे. या मालिकेमध्ये लवकरच नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. या मालिकेत दबंग मलायकाची भूमिकेत अभिनेत्री जसनीत कौर कांत हिची एंट्री होणार आहे. मुंबईमध्ये लहानाची मोठी झालेल्या जसनीतने छोट्या पडद्यावर भूमिका साकारल्या आहेत.
'हप्पू की उलटन पलटन' मालिकेत जसनीत कौरची एंट्री - hindi serial
मालिका 'हप्पू की उलटन पलटन' प्रेक्षकांना डोळ्यांतून अश्रू येईपर्यंत खदखदून हसवत आहे. या मालिकेमध्ये लवकरच नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. या मालिकेत दबंग मलायकाची भूमिकेत अभिनेत्री जसनीत कौर कांत हिची एंट्री होणार आहे. मुंबईमध्ये लहानाची मोठी झालेल्या जसनीतने छोट्या पडद्यावर भूमिका साकारल्या आहेत.
मलायकाची भूमिका दबंग वृत्ती असलेल्या टॉमबॉयसारखी आहे. तर जसनीतचे व्यक्तिमत्त्व अत्यंत मितभाषी आहे. जसनीतचे व्यक्तीमत्व मालिकेतील व्यक्तीरेखेसारखे आहे. ''मला मलायकाची भूमिका आवडली आहे. ती वेगळी असली तरी माझ्यासारखीच आहे. माझ्यासाठी ही सर्वोत्तम गोष्ट आहे. टीव्ही मालिका व रंगभूमीवर लहानशा भूमिका साकारल्यानंतर मी मालिकेमध्ये योग्य भूमिका मिळण्याबाबत खूपच सकारात्मक होते. याआधी मी अनेक ऑडिशन्स दिल्या. अखेर 'हप्पू की उलटन पलटन'साठी मला निवडण्यात आले. मी मालिका पाहत आहे. नेहमीच मालिकेचा दर्जा चांगला असून, त्यामधील पात्रांनी सादर केलेल्या विनोदांचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे. त्यामुळे असे प्रतिभावान कलाकार असल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजते. मला दररोज नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळत आहेत. या मालिकेत प्रेक्षकांना दबंग मलायकाचा नवीन अवतार पाहायला मिळेल. आता प्रेक्षक 'नवीन मलायका काय नवीन घेऊन येत आहे?' हे जाणून घेण्यास उत्सुक असतील.''