महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हा स्किट लय भारी! जॅकी दादांनी केलं निलेश साबळेंचं कौतुक - chala hawa yeu dya

थुकरटवाडीच्या कलाकारांनी रंगीला या आमिर खानच्या सुपरहिट चित्रपटाचं धमाल विनोदी स्पूफ सादर केलं. यात भाऊ कदम आमिर खान, श्रेया बुगडे उर्मिला मातोंडकर, तर निलेश साबळे जॅकी श्रॉफ साकारत होते.

जॅकी दादांनी केलं निलेश साबळेंचं कौतुक

By

Published : Apr 10, 2019, 11:17 AM IST

मुंबई- गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर या कार्यक्रमातील होऊ दे व्हायरल हे पर्व देखील गाजलं. इतकंच काय आता लवकरच 'चला हवा येऊ द्या'चं सिलेब्रिटी पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

गेल्या आठवड्यात प्रसारित झालेल्या चला हवा येऊ द्याच्या भागात बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव आले होते. त्यांच्या उपस्थितीत थुकरटवाडीतील विनोदवीरांनी एकच कल्ला केला. आमिर खान आणि किरण यांनी पाणी संवर्धनावर प्रेक्षकांसाठी एक स्किट केलं तर थुकरटवाडीच्या कलाकारांनी रंगीला या आमिर खानच्या सुपरहिट चित्रपटाचं धमाल विनोदी स्पूफ सादर केलं. यात भाऊ कदम आमिर खान, श्रेया बुगडे उर्मिला मातोंडकर, तर निलेश साबळे जॅकी श्रॉफ साकारत होते.

या स्किटनंतर आमिर खानने सर्व विनोदवीरांची खूप प्रशंसा केली. इतकंच काय तर स्वतः जॅकी श्रॉफने त्यांचं हे स्किट पाहून निलेशच्या परफॉर्मन्सचं कौतुक केलं. जॅकी श्रॉफ यांनी फोन करून निलेशची प्रशंसा केली. हा स्किट लय भारी झाला, असं देखील ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details