पुणे - 'एफटीआयआय' म्हणजे भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय चित्रपटसृष्टीचा चित्ररूपी इतिहास पाहण्याची संधी मिळणार आहे. चित्रपट क्षेत्रातील शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी भारतातील एकमेव संस्था म्हणून 'एफटीआयआय'ला ओळखले जाते. यंदा या संस्थेला 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर प्रभात स्टुडिओ आणि एफटीआयआयच्या आजवरच्या आठवणींची साक्ष देणाऱ्या छायाचित्राचं प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
'एफटीआयआय'च्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय चित्रपटसृष्टीचा चित्ररूपी इतिहास पाहण्याची संधी
चित्रपट क्षेत्रातील शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी भारतातील एकमेव संस्था म्हणून 'एफटीआयआय'ला ओळखले जाते. यंदा या संस्थेला 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर प्रभात स्टुडिओ आणि एफटीआयआयच्या आजवरच्या आठवणींची साक्ष देणाऱ्या छायाचित्राचं प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
'एफटीआयआय'च्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय चित्रपटसृष्टीचा चित्ररूपी इतिहास पाहण्याची संधी
संस्थेच्या प्रवेशद्वारावर कॅमेऱ्याची भली मोठी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या कॅमेऱ्याच्या आतमध्ये छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात आजवर जे दिग्दर्शक या संस्थेत शिकले, जे मान्यवर या संस्थेत येऊन गेले, ज्या परदेशी पाहुण्यांनी या संस्थेला भेटी दिल्या. तसेच, चित्रपट क्षेत्राव्यतिरिक्त जे प्रसिद्ध व्यक्ती या संस्थेत आले होते, या सर्वांचा छायाचित्ररुपी आढावा या प्रदर्शनातून मांडण्यात आला आहे.