मुंबई - संजय लीला भन्साळी यांनी कोविड -१९ लॉकडाऊनमुळे गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे शूटिंग अद्याप संपवलेले नाही. परंतु सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांच्या भूमिका असलेल्या हीरा मंडी या वेब सिरीजबद्दलचा उत्साह मावळलेला नाही. या वेब शोसाठी भन्साळी माधुरी दीक्षितसोबत पुन्हा एकत्र काम करणार आहे.
संजय लीला भन्साळी हिरा मंडी ही वेब सिरीज नेटफ्लिक्ससाठी बनवणार आहेत. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत या शोचे शुटिंग सुरू होईल. काही दिवसापूर्वी कार्तिक आर्यनने या शोसंबंधी भन्साळी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती.
माधुरी आणि एसएलबी तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा एकत्र येणार आहेत असे वर्तवली जात आहे. २००२ च्या देवदास हिट चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते ज्यात ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान देखील मुख्य भूमिकेत होते. वृत्तानुसार, या मालिकेमध्ये एका मुजरा परफॉर्मन्ससाठी माधुरी दीक्षितचा विचार भन्साळी करीत आहेत.
अभिनेत्री माधुरी ही निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीची नृत्य करणारी क्वीन आहे आणि याच कारणास्तव, भन्साळी यांना या डान्स सीक्वेन्ससाठी माधुरीशिवाय दुसऱ्या कोणालाही घेण्याची इच्छा नाही. भन्साळींची टीम आठ ते दहा दिवसांच्या शूटिंग शेड्यूलचे नियोजन करीत आहे, ज्यासाठी माधुरीला भरमसाठ रकमेची ऑफर देण्यात आली आहे.
हेही वाचा - भन्साळींच्या 'हिरा मंडी'मधून कार्तिक आर्यन करणार ओटीटी पदार्पण?