मुंबई - 'H२O' म्हटलं, की सर्वात पहिले समोर येतं ते पाण्याचं शास्त्रीय सूत्र. याचं कारण म्हणजे पाण्याला वैज्ञानिक भाषेत H२O असं संबोधलं जातं. मात्र, H2O या हटके नावाचा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले होते. आता या चित्रपटाचा टीजरही रिलीज करण्यात आला आहे.
थेंबाची कहाणी सांगणाऱ्या 'H२O' चा टीजर प्रदर्शित! - थेंबाची कहाणी
'H2O.. कहाणी थेंबाची', अशी दमदार टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीजरमध्येही पाण्याचं महत्व पटवून देण्यात आलं आहे.
थेंबाची कहाणी सांगणाऱ्या 'H२O' चा टीजर प्रदर्शित
'H2O.. कहाणी थेंबाची', अशी दमदार टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीजरमध्येही पाण्याचं महत्व पटवून देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये सर्व नवोदित कलाकारांचा समावेश आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलींद पाटील यांनी केलंय. तर, निर्मिती सुनिल झंवर यांनी केली आहे. हा चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.