महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कितने आदमी थे'.... आता गुगलही देणार उत्तर! - रमेश सिप्पी

अलिकडेच लोकप्रिय असलेल्या 'शोले' चित्रपटाला ४४ वर्षे पूर्ण झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी या चित्रपटाच्या आठवणीत एक ट्विट केले होते.

'कितने आदमी थे'.... आता गुगलही देणार उत्तर!

By

Published : Aug 17, 2019, 9:22 AM IST

मुंबई - जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून 'गुगल'ला ओळखले जाते. अशी कोणतीही गोष्ट नाही, जी गुगलला माहित नसेल. हे आता आणखी एका गोष्टीवरून सिद्ध झाले आहे. गुगल आता पूर्णत: देसी झाले आहे. होय. कारण, आता गुगलवर जरी 'शोले'चा लोकप्रिय संवाद टाईप केला. तर गुगल क्षणार्धात त्या प्रश्नाचे उत्तर देतो.

गुगलच्या सर्चबॉक्समध्ये जर 'कितने आदमी थे' असं टाईप केलं. तर, लगेचच कॅल्क्युलेटरमध्ये '२' ही संख्या पहिल्यांदा दिसते.

अलिकडेच लोकप्रिय असलेल्या 'शोले' चित्रपटाला ४४ वर्षे पूर्ण झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी या चित्रपटाच्या आठवणीत एक ट्विट केले होते. या चित्रपटातीलच गब्बरच्या तोंडी असलेला हा डायलॉग आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.

सोशल मीडियावरही या चित्रपटातील संवादांवर भरपूर मिम्स तयार केले गेले आहेत. तसेच, यातील पात्र, आजही प्रेक्षकांच्या मनात रुजलेली आहेत. त्यामुळेच आता गुगलही 'कितने आदमी थे'चं उत्तर देताना दिसतो.

ABOUT THE AUTHOR

...view details