मुंबई - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा आगामी चित्रपट 'घूमकेतू' डिजीटल प्लॅटफॉर्मवरुन रिलीज होणार आहे. झी ५च्या माध्यामातून याचे स्ट्रीमिंग ओटीटीवर होणार आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न करता थेट डिजीटल माध्यमातून रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला आहे. त्यामुळे चित्रपट चाहत्यांना घराबाहेर न जाता नवाजचा नवा चित्रपट पाहाता येणार आहे.
पुष्पेंद्र नाथ मिश्रा यांनी दिग्दर्शित केलेला 'घूमकेतू' हा चित्रपट एक कॉमेडी ड्रामा आहे. यात नवाजुद्दीन एका लेखकाची भूमिका साकारत आहे. मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करणाऱ्या लेखकाची ही व्यक्तीरेखा आहे.