मुंबई- 'झी मराठी' वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. टीआरपीच्या यादीतही ही मालिका नेहमी अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेतील ईशा आणि ईशाची आई ही जोडीदेखील अगदी लोकप्रिय आहे. ईशाची आई जितकी स्पष्टवक्ती आहे, तितकीच मायाळूही आहे. विशेष म्हणजे गायत्री आणि गार्गी यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीदेखील तितकीच चांगली आहे.
गार्गी ताईसोबत काम करणं म्हणजे नुसती धमाल - गायत्री दातार - mothers day
मदर्स डेबद्दल बोलताना ती म्हणाली, मी आईसाठी नक्कीच एक सरप्राईज प्लॅन करेन. माझ्या आईसोबत माझं खूप घट्ट नातं आहे. पण मला असं वाटतं की आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एकच दिवस पुरेसा नाही. ती जेव्हा माझ्यासोबत असते तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी मदर्स डे आहे.
मदर्स डे निमित्त गायत्री तिच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन आईबद्दल सांगताना म्हणाली, गार्गी ताईसोबत काम करणं म्हणजे धमाल. मी तिच्याकडून खूप काही शिकत आहे. ज्या सहजतेने ती अभिनय करते, तसंच तिचं भाषेवरचं प्रभुत्व हे सगळं वाखाण्याजोगं आहे आणि मी तिच्याकडून जितकं शिकता येईल तितकं शिकत आहे.
यासोबतच मदर्स डेबद्दल बोलताना ती म्हणाली, मी आईसाठी नक्कीच एक सरप्राईज प्लॅन करेन. माझ्या आईसोबत माझं खूप घट्ट नातं आहे. ती मला नेहमीच प्रोत्साहन देते. पण मला असं वाटतं की आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी एकच दिवस पुरेसा नाही. ती जेव्हा माझ्यासोबत असते तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी मदर्स डे आहे.