मुंबई- केदार शिंदे यांच्या घरी दरवर्षी बाप्पाचं आगमन होतं. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून केदार आवर्जून बाप्पाच्या स्वागतासाठी वेळ काढतात. गेली काही वर्षे हिंदीत रमलेले केदार यावर्षीच्या अखेरपर्यंत मराठी प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. केदारच्या घरची गणेशमूर्ती लालबागच्या राजाची प्रतिकृती असते.
हेही वाचा - 'राणादा'ने ठाणे सार्वजनिक गणेशोत्सवात केली बाप्पाची आरती
लालबागच्या राजाची मूर्ती साकारणारे मूर्तिकार केदारच्या बाप्पाची मूर्ती साकारतात. गेले काही वर्षे हिंदी मालिकांमध्ये फार व्यग्र झाल्यामुळे केदार यांच्याकडे सणासाठी एकच दिवसाची सुट्टी असायची. मात्र, यंदा 2 दिवसाची सुट्टी मिळाल्याने केदार आनंदात आहेत. घरात बाप्पाचं आगमन झालं, की अनेक मित्रमंडळी आणि आप्तेष्टांचा राबता त्यांच्या घरी असतो. त्यामुळे यानिमित्ताने एकमेकांशी भेटीगाठी होत असल्याने त्याचं समाधान वेगळंच असल्याचं केदार म्हणतात.
केदार शिंदेंच्या घरील बाप्पा आपल्या भावी पिढ्यांचा विचार करून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणं, हे आपलं कर्तव्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. हे केलं नाही तर भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, असं ते 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
हेही वाचा -गायिका नेहा राजपालनं बाप्पासाठी केला 'चांद्रयान -2'चा देखावा