कर्जतच्या 'एन डी स्टुडिओ' मध्ये सरत्या वर्षाला निरोप देऊन वर्ष 2020च जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या निमित्ताने संपूर्ण स्टुडिओ अतिशय आकर्षक रोषणाईने सजवण्यात आलेला होता. यंदा प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्या ग्रुपचा डान्स परफॉर्मन्स हे या नववर्ष स्वागत सोहळ्याचं मुख्य आकर्षण होत. तर 'मराठी बिग बॉस' फेम अभिनेत्री हिना पांचाळ हिने देखील येथे खास परफॉर्मन्स दिला.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पानिपत' या सिनेमाच्या सेटचा काही भाग वापरून संपूर्ण स्टेज सजवण्यात आले होते. एकूणच या सोहळ्याचा रागरंग नितीन देसाई यांच्या सेट्स प्रमाणेच भव्यदिव्य होता. देशविदेशातून आलेले अनेक नृत्य कलावंत आणि बेली डान्सर्स यांनीही आपली कला येथे सादर केली. या खास सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी अनेक मुंबईकर आणि पुणेकरांची पावलं एन डी स्टुडिओकडे वळली..