मुंबई -एखादी व्यक्ती प्रसिद्ध होण्यासाठी काय करेल याचा काहीही अंदाज लावता येत नाही. सोशल मीडियावर तर असे बरेच युजर्स प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काही ना काही उपदव्याप करताना पाहायला मिळतात. यापैकीच एक प्रसिद्ध असलेलं नाव म्हणजे 'ढिंच्याक पूजा'. तिने अलिकडेच तिचे एक नवे गाणे सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे गाणे पाहून नेटकऱ्यांना खरंच वेड लागण्याची वेळ आली आहे.
'सेल्फी मैने ले ली आज' या गाण्यापासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेली ढिंच्याक पूजा आता नवं गाण घेऊन आली आहे. 'नाच के पागल', असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याच्या बोलाप्रमाणेच नेटकऱ्यांना खरोखरच पागल केलं आहे.