यवतमाळ- शेतकऱ्याने फक्त शेतीच करावी असं नाही, तर त्याची इतरही स्वप्न असतात. ते पूर्ण करण्यासाठी गरज असते ती इच्छाशक्तीची. याच इच्छाशक्तीच्या जोरावर जय खिल्लारे यांनी गणपती बाप्पावरील एक भक्तीगीत प्रेक्षकांच्या समोर आणले आहे. शेतकऱ्याच्या या गीताला नागरीकांचा भरपूर प्रतिसाद मिळताना दिसतोय.
जय खिल्लारे हे पुसद तालुक्यातील काटखेडा या छोट्याशा गावचे रहिवासी. शेतीत काम करत असताना त्यांनी आपले संगीताचे स्वप्न मनाशी बाळगले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक धून लॉन्च केलीत. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांची प्रगती होत नव्हती. पण ते म्हणतात ना प्रयत्नाअंती परमेश्वर या म्हणीप्रमाणे आज त्यांनी परमेश्वराचे गाणे लॉन्च केले व आपल्या स्वप्नपूर्ती कडे एक पाऊल टाकले आहे.