महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कॉमेडी करणे सर्वात कठीण काम - bhabiji ghar par he

पडद्यावर प्रेक्षकांना आपल्या विनोदाने खळखळून हसवणे हे खरच आव्हानात्मक काम. आजच्या कोरोनाच्या संकटकाळात सगळीकडे अशाच विनोदाची नितांत गरज आहे. नुकताच वर्ल्ड लाफ्टर डे झाला. त्यानिमित्ताने छोट्या पडद्यावर कॉमेडी करणाऱ्या कलाकारांची मते जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न....

विनोद करणे कठीण काम
विनोद करणे कठीण काम

By

Published : May 3, 2021, 6:30 PM IST

मुंबई - हास्‍य हे सर्वोत्तम औषध आहे आणि प्रत्‍येकजण गालातल्‍या गालात हसण्‍याचा आनंद घेत काही क्षणांसाठी सर्व चिंता विसरून जातात. विनोदी मालिका विशेषत: अशा आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये कुटुंबाला परिपूर्ण मनोरंजनाचा आनंद देतात. प्रेक्षकांच्‍या आवडीच्‍या देखील काही मालिका असतात, ज्‍या त्‍यांना हसवून-हसवून लोटपोट करत असतील. अनेक घरामधील सदस्‍यांना हसवून-हसवून लोटपोट करणारे लोकप्रिय कलाकार राजू श्रीवास्तव, आसिफ शेख, अनु अवस्‍थी, शुभांगी अत्रे, योगेश त्रिपाठी आणि रोहिताश्‍व गौड त्‍यांना हसवणा-या गोष्‍टींबाबत सांगत आहेत.

राजू श्रीवास्‍तव

कानपुरिया शैली आवडते...

दिग्‍गज कॉमेडीयन राजू श्रीवास्‍तव म्‍हणाले, ''आपणा सर्वांना माहितच आहे की, मी कानपूरचा आहे आणि माझे कुटुंब व मी एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है' व 'हप्‍पू की उलटन पलटन' पाहण्‍याचा आनंद घेतो. दोन्‍ही मालिकांमध्‍ये आपुलकी आहे आणि कडक कानपुरियाशैली सर्वांना हसवते. आम्‍ही अजूनपर्यंत एकही एपिसोड पाहायला चुकलो नाही. हप्‍पू व त्‍याचे कुटुंब, त्‍यांच्‍यामधील सातत्‍यपूर्ण नोक-झोक आवडतात. 'न्‍योछावर कर दो', 'अरे दादा', 'गुर्दे छील देंगे', गुईयाँ के खेत में', 'कंटाप', 'निंबु निचोड देंगे', 'भौकाल', 'चिरांड' हे संवाद मला खूपच आवडतात. सर्व कलाकारांची शैली अत्‍यंत अनोखी आहे. तुम्‍ही दोन्‍ही मालिकांच्‍या नवीन एपिसोड्सना पाहून हसून-हसून लोटपोट व्हाल.

मेहमूदजींचा माझ्यावर प्रभाव....

''मी मनोरंजन क्षेत्रामध्‍ये आल्‍यापासून माझा सर्वतोपरी लोकांना आनंदी करण्‍याचा उद्देश राहिला आहे. ही आमची सुपरशक्‍ती आहे की आम्‍ही टेलिव्हिजन व मोठ्या पडद्याच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना अनेक भावनांचा अनुभव देऊ शकतो, असे एक परफॉर्मर म्हणून वाटते. माझ्यावर प्रभाव असलेले असे एक व्यक्‍ती म्‍हणजे मेहमूदजी. त्‍यांची विनोदीशैली मला नेहमीच अचंबित करते. मी अनेकदा माझ्या मित्रांसाठी त्‍यांच्‍या विनोदांचा वापर करतो. तसेच त्‍यांच्‍याप्रमाणे बोलण्‍याचा प्रयत्‍नही करतो. मालिका 'भाबीजी घर पर है'मध्‍ये मला त्‍यांच्या'नयी पडोसन'मधील भूमिकेसारखी भूमिका साकारण्‍याची संधी मिळाली. माझ्यासाठी तो मोठा सन्‍मान होता, असेही 'भाबीजी घर पर है'मधील आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्‍हणाले.

आसिफ शेख

विनोद मला हसवतो...

''कॉमेडीयन म्‍हणून माझी ओळख कानपूरमधील स्‍थानिक पातळीवरून सुरू झाली. मी कधीच कल्‍पना केली नव्‍हती की मी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचेन. मला हसवणारी गोष्‍ट म्‍हणजे उत्तम विनोद असलेली उत्तम पटकथा. माझ्यासाठी हीच गोष्‍ट 'और भई क्‍या चल रहा है?'मध्‍ये आहे. यातील उत्तम विनोद व कन्‍टेन्‍ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील. मला कॉमेडी करण्यात स्वातंत्र्य मिळते,असेही 'मालिका 'और भई क्‍या चल रहा है?'मधील अनु अवस्‍थी ऊर्फ बिट्टू कपूर यांनी मत व्यक्त केले.

अनु अवस्‍थी

स्‍टॅण्‍ड-अप कॉमेडी आवडते....

''मी मनोरंजन क्षेत्रामध्‍ये आल्यावर विनोदीशैलीमध्‍ये निपुण असेन असे वाटले नव्हते. मालिका 'भाबीजी घर पर है'सह मला विनोदीशैली आत्‍मसात करण्‍याची संधी मिळाली. मी स्‍टॅण्‍ड-अप कॉमेडी पाहण्‍याचा आनंद घेते. मला त्‍यामधील उत्‍स्‍फूर्त सत्रे आवडतात आणि प्रेक्षकांसोबत मिळून-मिसळून जाते. मला रसेल पीटर्सची विनोदीशैली व सर्वोत्तम सादरीकरणासाठी पाहायला आवडते. असेही अंगुरी भाभी हिने सांगितले.

अंगुरी भाभी

लोकांना हसवणे ही एक कला...

''मी जेव्‍हापासून 'अरे दादा' संवाद म्‍हणायला लागलो. तेव्हा हा संवाद माझ्या भूमिकेचा अंतर्गत भाग बनेल आणि प्रेक्षकांना ते आवडेल. लहान मुले हप्‍पू दादा म्‍हणून हाक मारतात, तेव्‍हा आनंद होतो. लोकांना हसवणे ही एक कला आहे. जी मी सर्वात महान कॉमेडीयन – चार्ली चॅपलिन यांच्‍याकडून शिकलो आहे. या महान व्‍यक्‍तीने मूक कॉमेडीला नव्‍या उंचीवर नेले. फक्‍त हावभाव लोकांना अचंबित करण्‍यासाठी पुरेसे आहेत. त्‍यांची सादरीकरणे व वागण्‍याच्‍या पद्धतीमधून हजारो शब्‍द समोर आले, त्‍यांनी अगदी सहजपणे सर्वांना हसवले आणि जगाला एकत्र आणले, असेही 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ हप्‍पू सिंग म्‍हणाले.

योगेश गौर

बदल घडवणारी कॉमेडी...

''कॉमेडी हे जगामध्‍ये शांततापूर्वक व सकारात्‍मक पद्धतीने बदल घडून आणू शकते. सद्यस्थितीमध्‍ये आपण सर्व जगाला आनंदमय स्‍थळ बनवण्‍याचा प्रयत्‍न करत असतात. मी सेटवर माझ्या संवादांचा सराव करते. 'हा संवाद प्रेक्षकांना हसवेल का?' हा प्रश्न मी स्वत:ला विचारते. हजारो लोक रोजच्‍या व्‍यस्‍त कामकाजामधून विरंगुळा म्‍हणून टेलिव्हिजन पाहतात. माझ्यासाठी दिग्‍गज जॉनी वॉकर आणि 'शिकार' व 'चाची ४२०' सारख्‍या चित्रपटांमधील त्‍यांच्‍या विनोदी भूमिका आवडत्‍या आहेत. तसेच ओम पुरी, परेश रावल, बोमन इराणी, जॉनी लिव्‍हर यांनी त्‍यांच्‍या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवले आहे, असे अभिनेता मनमोहन तिवारी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details