बिग बॉस मराठी सिझन 3 मध्ये स्पर्धक अनेक टास्क पार करीत आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परवा सुरेखा कुडची घरातून बाहेर गेल्यानंतर भावूक झालेले सदस्य पुन्हा सावरले आहेत. आता कॅप्टन होण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. पण कॅप्टन होण्यासाठी शोधावे लागणार आहेत चक्क भोपळे.
यासाठी बिग बॉसच्या घरात भोपळ्यांवर स्पर्धकांची नावे लिहिण्यात आली आहेत. यासाठी सदस्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात येणार आहे. यासाठी जो सदस्य भोपळा शोधून भिंत ओलांडण्यात यशस्वी होईल तो कॅप्टन पदासाठी पात्र उमेद्वार ठरु शकतो.