महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमिताभ बच्चन ते रणबीर कपूर, अंबानींच्या घरी गणेश आरतीसाठी बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी - डेझी शाह

गणेशोत्सवाचे ग्रॅन्ड सेलिब्रेशन करण्यासाठी आणि आरतीसाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनपासून रणबीर कपूरपर्यंत बरेच कलाकार उपस्थित होते. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अमिताभ बच्चन ते रणबीर कपूर, अंबानींच्या घरी गणेश आरतीसाठी बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी

By

Published : Sep 3, 2019, 8:07 PM IST

मुंबई -मुकेश अंबानीचे निवासस्थान एंटीलिया येथे गणेश आरतीसाठी बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. या खास क्षणी अंबानींचे निवासस्थान अगदी नव्या नवरीप्रमाणे सजवण्यात आले होते. गणेशोत्सवाचे ग्रॅन्ड सेलिब्रेशन करण्यासाठी आणि आरतीसाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनपासून रणबीर कपूरपर्यंत बरेच कलाकार उपस्थित होते. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुकेश अंबानी यांच्या घरी गणेश पुजनाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषाने गणरायाचे स्वागत केले जाते. मुकेश अंबानीची मुलगी ईशा हिच्या लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव असल्याने ती देखील यावेळी उपस्थित होती.

हेही वाचा -बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचं आगमन, 'अशा' दिल्या शुभेच्छा

बॉलिवूड कलाकारांनीही आपल्या घरी गणरायाची स्थापना केली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टी, नील नितीन मुकेश, डेझी शाह, सलमान खानची बहिण अर्पिता खान, सोनाली बेंद्रे, विवेक ओबेरॉय यांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details