महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

डॉ. श्रीराम लागूंच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा, पंतप्रधान मोदींनीही वाहिली श्रध्दांजली - PM Modi mourn demise of Dr. Shriram Lagoo

मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी रात्री ९२ व्या वर्षी निधन झाले. अनेक स्तरावरच्या लोकांपासून बॉलिवूड कलाकारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

Dr. Lagoo pass away
डॉ. श्रीराम लागू यांचे निधन

By

Published : Dec 18, 2019, 4:37 PM IST


मुंबई - मराठी रंभूमीवरील नटसम्राट डॉ. श्री राम लागू यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा परली आहे. बॉलिवूड, दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री आणि मराठी कलावंत यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

डॉ. लागू यांना आठवत ऋषी कपूर यांनी ट्विटरवर म्हटलंय, "R I P , सर्वात नैसर्गिक आणि सहज अभिनयाबद्दल ओळखले जाणाऱ्या डॉ. श्रीराम लागू आपल्याला सोडून गेले.दुर्दैवाने गेल्या २५-३० वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. लव्ह यू डॉ. साहब."

चित्रपट निर्माता मधुर भंडारकर यांनी शोक व्यक्त करताना लिहिलंय, "अनुभवी अभिनेता डॉ. # श्रीरामलागू सर यांच्या निधनाने दुःख झाले. ते महान समाजवादी आणि चतुरस्त्र अभिनेता होते. त्यांचे रंगमंंंच आणि चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी आणि भूमिकांसाठी ते नेहमी स्मरणात राहतील.

दिग्गज अभिनेता परेश रावल यांनी लिहिलंय, "एक महान रंगमंचावरील अभिनेता डॉ. श्रीराम लागू. ओम शांती."

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरल यांनी लिहिलंय, ''तुम्ही होता म्हणुन मी घडले..एका सामान्य घरातल्या मुलीमधली अभिनयाची चमक फक्त तुम्ही पाहिली आणि मला रुपेरी पडद्यावर आणली. “सामाजिक बांधीलकी” तुमच्याकडुन शिकले. तुमचे ऋण कधीच फेडता येणार नाही.''

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिलंय, "श्रीराम लागू वर्षानुवर्षे चतुरस्त्र अभिनयाचे दर्शन देत आले. त्यांनी उत्कृष्ट सादरीकरणासोबतच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे काम येणाऱ्या वर्षातही स्मरणात राहिल. त्यांच्या निधनामुळे दुःख झाले. त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात सहभागी होत आहे. ओम शांती."

ABOUT THE AUTHOR

...view details