मुंबई -पंतप्रधान मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहनानंतर रविवारी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू पाळण्यात आला आहे. नागरिकांनी रविवारी संध्याकाळी ५ नंतर टाळ्या, थाळ्या आणि शंखनाद करून कोरोना व्हायरस सोबत लढणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले होते. जनता कर्फ्यूला सहकार्य करत नागरिकांसोबतच कलाविश्वातील कलाकारांनीही टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद करुन कृतज्ञता व्यक्त केली आहे.
GO CORONA : बॉलिवूड कलाकारांनीही केला टाळ्या, थाळ्यासह घंटानाद - GO CORONA
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन, तमन्ना भाटीया, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, करण जोहर, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, रकुल प्रित, अमिषा पटेल, अनुपम खेर, बॉबी देओल, यांसारख्या कलाकारांनी आपल्या घराच्या बाल्कनीत उभे राहून टाळ्यांचा नाद केला.
GO CORONA : बॉलिवूड कलाकारांनीही केला टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद
यामध्ये बॉलिवूड अभिनेता वरुण धवन, तमन्ना भाटीया, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, करण जोहर, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, रकुल प्रित, अमिषा पटेल, अनुपम खेर, बॉबी देओल, यांसारख्या कलाकारांनी आपल्या घराच्या बाल्कनीत उभे राहून टाळ्यांचा नाद केला. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.