महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनेत्री 'मनिषा केळकर'ने अपघातावर मात करत केलं बॉडी ट्रान्सफोरमेशन

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नावारूपाला आलेली अभिनेत्री 'मनिषा केळकर'ने कार अपघातावर मात करत अवघ्या पाच महिन्यात बॉडी ट्रान्सफॉरमेशन केलं आहे. यात मनिषाला तिचा फिटनेस कोच व आहारतज्ञ 'अक्षय कदम' याने साथ दिली.

actress manisha kelkar
actress manisha kelkar

By

Published : Nov 21, 2021, 3:46 PM IST

मुंबई -लॉकडाऊनमध्ये सगळेच लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यात मराठी सेलिब्रिटींचाही समावेश आहे. एक मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नावारूपाला आलेली अभिनेत्री 'मनिषा केळकर'ने कार अपघातावर मात करत अवघ्या पाच महिन्यात बॉडी ट्रान्सफॉरमेशन केलं आहे. यात मनिषाला तिचा फिटनेस कोच व आहारतज्ञ 'अक्षय कदम' याने साथ दिली. तिने नुकताच तिने या ट्रान्सफोरमेशनच व्हिडीओ तिच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

'मनिषा केळकरचे बॉडी ट्रान्सफोरमेशन

मनिषा केळकरने 'ह्यांचा काही नेम नाही', 'मिशन पॉसिबल', 'चंद्रकोर', 'वंशवेल' असे मराठी सिनेमे केलेत तर 'लॉटरी' आणि 'बंदूक' या हिंदी सिनेमांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. मराठी आणि हिंदी सिनेमांव्यतिरीक्त मनिषाने अनेक कार्यक्रमात निवेदनही केले आहे. त्यानंतर २०१८ मध्ये मनिषाने फॉर्म्युला फोर कार रेसर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून त्या ध्येयाकडे वाटचाल केली.

अभिनेत्री 'मनिषा केळकर

मनीषाने सांगितला शेयर केला अनुभव

अभिनेत्री व फॉर्म्युला फोर कार रेसर 'मनिषा केळकर' तिच्या बॉडी ट्रान्सफोरमेशन विषयी सांगते, ''लॉकडाऊनपूर्वी माझा कार अपघात झाला. त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की मी आता कार रेसींग करू शकणार नाही. परंतु मी उपचारानंतर फिजीओ थेरपी सुरू केली आणि हळूहळू रिकव्हर झाले. त्यानंतर काही महिन्यांनी मी फिटनेस कोच व न्यूट्रीशनीस्ट अक्षय कदम यांच्या सहाय्याने वर्कआऊट करण्यास सुरूवात केली. मी मोटर स्पोर्ट सुरू केलं तेव्हा मला खूपच अशक्तपणा जाणवत होता. परंतु वर्कआऊटमुळे माझ्यातील मस्सल पावर, स्टॅमिना वाढण्यास मदत झाली. आणि रेसींगसाठी ते फार महत्त्वाचं असतं. त्या कार अपघातामुळे मी फार खचून गेलेले. परंतु व्यायाम, पौष्टीक डायट व सातत्य यामुळे मी आता पुन्हा एकदा अभिनय आणि कार रेसींग करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे."

हेही वाचा -Rakhi Samvat's reaction :पाहा, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राखी सांवतची उत्स्फुर्त प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details