मुंबई - अभिनेत्री रुबीना दिलाइक हिला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा सल्ला सुपरस्टार सलमान खानने दिला आहे. रुबीनाच्या वागणुकीवर सलमान भडकल्याचे दिसते. प्रोमोमध्ये दिसते की, सर्व स्पर्धकांना एक टास्क दिलेला आहे, यात भाग घ्यायला रुबीना नकार देते. आपल्या आत्मसन्मानाच्या विरोधात ही गोष्ट असल्याचे तिने म्हटलंय.
रुबीना प्रोमो क्लिपमध्ये म्हणते, "मी प्रियंकाचा भाग नाही. मी काही कचऱ्याचा ढीग नाही. आता आमच्या घराचे लोक म्हणत आहेत की माझ्या डोक्यात कचरा आहे. मला या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे."