मुंबई- सलमान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बिग बॉसच्या सेटवर नवाजुद्दीन पोहोचणार असून सलमानसोबत धमाल मस्ती करताना दिसणार आहे.
ब्लॉकबस्टर 'बजरंगी भाईजान'ची सलमान आणि नवाजची जोडी 'बिग बॉस 13' च्या 'वीकेंड के वार' मध्ये झळकणार आहे. स्पर्धकांना सुपर किक देण्यासाठी या शोमध्ये नवाज येणार आहे.