मुंबई -बॉलिवूडमध्ये सध्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाच्या चर्चांचे वारे वाहत आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोघे लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता एप्रिल महिना संपत आला तरीही दोघांकडुनही अद्याप कुठली तयारी दिसत नसल्याने अर्जुन कपुरला याबाबत विचारण्यात आले होते.
मलायकासोबत लग्नाच्या चर्चांवर अर्जुन कपुर म्हणतो....
बॉलिवूडमध्ये सध्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाच्या चर्चांचे वारे वाहत आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोघे लग्न करणार असल्याचे बोलले जात होते.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन कपुरने पहिल्यांदाच त्याच्या लग्नाबाबत माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला, की 'मी अजुन फक्त ३३ वर्षांचाच आहे. सध्यातरी मी लग्न करणार नाही. मला लग्नाची घाईदेखील नाही. मात्र, मलायका माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. जेव्हाही माझे लग्न ठरेल, तेव्हा मी स्वत:हुन याबाबत माहिती देईल'. 'माझ्या आणि मलायकाच्या लग्नाच्या चर्चांवरही मला कोणतीही आपत्ती नाही. माध्यमं आपली काम करत असतात', असेही त्याने म्हटले आहे.
सध्या अर्जुन कपुर त्याच्या आगामी 'पानीपत' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच त्याचा 'इंडियाज मोस्ट वांन्टेड' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता.