सोलापूर -आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी सध्या पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. येथील चंद्रभागेच्या पात्रात लाखो वारकरी महिला उघड्यावर कपडे बदलतात. त्यांच्यासाठी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी आपल्या सुर्योदय फाऊंडेशनच्या वतीने चंद्रभागेच्या पात्रात उघड्यावर कपडे बदलणाऱ्या महिलांसाठी कपडे बदलण्यासाठी रुमची सेवा उपलब्ध करून दिली आहे.
चंद्रभागेच्या पात्रात उघड्यावर स्नान करणाऱ्या महिलांना अनुराधा पौडवाल यांनी दिला आडोसा
अनुराधा पौडवाल यांनी आपल्या सुर्योदय फाऊंडेशनच्या वतीने चंद्रभागेच्या पात्रात उघड्यावर कपडे बदलणाऱ्या महिलांसाठी चेंजिंग रुमची सेवा उपलब्ध करुन दिली आहे.
चंद्रभागेच्या पात्रात उघड्यावर आंघोळ करणाऱ्या महिलांना अनुराधा पौडवाल यांनी दिला आडोसा
अनुराधा यांच्या पुढाकारामुळे महिलांना एका अर्थाने दिलासा मिळाला आहे.