महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चित्रपटात काम करण्यासाठी अमोल कांगणेने घटवले ७ किलो वजन - myad ra

'बाबो' हा मल्टीस्टारर विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटासाठी अमोलने विशेष मेहनत घेतली आहे. दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करणारा अमोल कागणे सध्या अभिनयातले खाचखळगे जाणून घेत आहेत. त्यासाठी लागेल तेवढे कष्ट घेण्याची तयारी तो दाखवत आहे.

चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेता अमोल कांगणेने 7 किलो वजन घटवले

By

Published : May 3, 2019, 8:00 PM IST

मुंबई - मनोरंजन क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक हौशी कलावंत प्रयत्न करीत असतात. एका अभिनेत्यामध्ये अभिनयासोबतच त्याच्या दिसण्यालाही अतिशय महत्त्व असते. एक यशस्वी निर्माता म्हणून नावाजला गेल्यानंतर अमोल कागणे आपले खरे पॅशन म्हणजेच अभिनयात नशीब आजमावणार आहे. तो 'बाबो' या आगामी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. त्यासाठी त्याने केवळ एका महिन्यात तब्बल ७ किलो वजन घटवले आहे.

'बाबो' हा मल्टीस्टारर विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटासाठी अमोलने विशेष मेहनत घेतली आहे. दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करणारा अमोल कागणे सध्या अभिनयातले खाचखळगे जाणून घेत आहेत. त्यासाठी लागेल तेवढे कष्ट घेण्याची तयारी तो दाखवत आहे. अमोल एका स्टायलिश हिरोच्या अंदाजात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.

चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेता अमोल कांगणेने 7 किलो वजन घटवले

अलीकडेच 'बाबो'मधील 'म्याड रं' हे गाणं तसेच टिझरमधून आपल्याला यांच्या अभिनयाची एक झलक पहायला मिळतेय. त्यांचा हा नवीन अंदाज पाहून यामागील रहस्य विचारले असता, 'मला 'बाबो' चित्रपटाची ऑफर आली त्यानंतर एका महिन्याने चित्रीकरणाला सुरवात होणार होती. त्यामुळे माझ्याजवळ स्वतःकडे जरा अधिक लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ होता. प्रत्यक्षात दिसणारे व्यक्तिमत्व पडद्यावरही तितकेच आकर्षक दिसावे, याकरिता मी प्रॉपर डाएट आणि वर्कआउट फॉलो केला. त्याचा अतिशय चांगला रिझल्ट मला मिळाला. जो तुम्हीही पाहू शकता', असं निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेता अमोल कागणे यांने स्पष्ट केले आहे. ३१ मेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details