महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'ढलती उम्र' सोबत फोटो शेअर करत 'बिग बीं'नी व्यक्त केली 'ही' खंत - सोशल मीडिया

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या फोटोंमध्ये त्यांनी पांढरा शर्ट आणि धोतर घातलेले दिसत आहे. तसेच  त्यांच्या पायात स्पोर्ट्स शुजही पाहायला मिळतात. या फोटोंवर 'बिंग बीं'नी दिलेले कॅप्शही चाहत्यांचे लक्ष वेधुन घेत आहे.

'ढलती उम्र' सोबत फोटो शेअर करत 'बिग बीं'नी व्यक्त केली 'ही' खंत

By

Published : Mar 31, 2019, 7:44 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेळोवेळी ते त्यांच्या भावना चाहत्यांशी व्यक्त करतात. अलिकडेच त्यांनी सोशल मीडियावर त्यांचे वाढत्या वयातले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते खूपच वयस्कर वाटत आहेत. हे फोटो शेअर करून त्यांनी एक खंतदेखील व्यक्त केली आहे.


अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या फोटोंमध्ये त्यांनी पांढरा शर्ट आणि धोती घातलेले दिसत आहे. तसेच त्यांच्या पायात स्पोर्ट्स शुजही पाहायला मिळतात. या फोटोंवर 'बिंग बीं'नी दिलेले कॅप्शही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
'वाढत्या वयासह एका गोष्टीची खंत नेहमी वाटते, आपल्याला 'तू' म्हणून बोलणाऱया लोकांची संख्या कमी होते', असे त्यांनी या फोटोवर कॅप्शन दिले आहे.


'बिग बीं'च्या या फोटोंवरून हे फोटो चित्रीकरणादरम्यानचे आहेत, हे स्पष्ट होते. मात्र, नेमक्या कोणत्या कारणासाठी त्यांनी हा लूक केला आहे, हे समजत नाही. ७६ व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांचे व्यक्तिमत्व भल्याभल्यांना आश्चर्यचकीत करते. उमद्या जोमाने ते नव्या कलाकारांसोबत भूमिका साकारतात. अलिकडेच त्यांचा 'बदला' चित्रपट प्रदर्शित झाला. लवकरच ते रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातदेखील दिसणार आहेत. तसेच, 'कौन बनेगा करोडपती'च्या ११ व्या पर्वाचे सुत्रसंचालन करतानाही दिसणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details