मुंबई -सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आता सरकार प्रयत्न करत आहे. सामाजिक स्तरातूनही अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे सरसावला आहे. तर, कलाविश्वातूनही बरेच कलाकार आपली मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवत आहेत.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पूरग्रस्तांसाठी ५१ लाखांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबद्दल माहिती देत बिग बींचे आभार व्यक्त केले आहेत.