महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

केआरकेच्या गाण्यावर बच्चन फिदा, बिग बीने शेअर केली गाण्याची लिंक - Tum Meri Ho song launch

अमिताभ बच्चन यांनी केआरकेच्या गाण्यावर प्रतिक्रिया देत ट्विटरवर लिंकही शेअर केली आहे. बिग बी यांचे ट्विट पाहून केआरकेनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

केआरके याच्या 'तुम मेरी हो' या गाण्याचा व्हिडिओ

By

Published : Sep 14, 2019, 3:15 PM IST


बॉलिवूड अभिनेता, निर्माता आणि समिक्षक अशा भूमिकेत वावरणाऱ्या कमाल आर खान उर्फ केआरके याच्या 'तुम मेरी हो' या गाण्याचा व्हिडिओ सध्या रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे या गाण्याला अमिताभ बच्चन यांनी प्रतिसाद दिलाय. बिग बी यांनी या गाण्याची लिंक आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे.

अमिताभ यांनी या व्हिडिओची लिंक शेअर करीत प्रतिक्रियामध्ये लिहिलंय, "सादर करीत आहे केआरके आणि आयराचे गाणे 'तुम मेरी हो.' याचे शब्द केआरकेने लिहिलेत आणि दिग्दर्शन केलंय नितीश चंद्रा यांनी."

अमिताभ यांच्या या ट्विटला केआरकेने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिलंय, "अमिताभ बच्चन सर तुमचे खूप खूप आभार." अमिताभ सारख्या व्यक्तीने आपली नोंद घ्यावी हे कोणत्याही कलाकारासाठी बहुमानाची गोष्ट असते. कमाल खानच्या 'तुम मेरी हो' या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कमाल खानने 'देशद्रोही' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'बिग बॉस'च्या तिसऱ्या पर्वात त्याने धमाल उडवून दिली होती. तो आता जरी सिनेक्षेत्रापासून थोडा दूर गेलेला असला तरी सोशल मीडियावरुन तो नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असतो.

ABOUT THE AUTHOR

...view details