मुंबई -मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि करिना कपूर खान यांची जोडी 'थ्री-इडियट्स' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटानंतर पुन्हा एकदा या दोघांना एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. आमिर खानचा आगामी चित्रपट 'लाल सिंग चढ्ढा'मध्ये करिनाची वर्णी लागली आहे. त्यामुळे लवकरच करिना या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज होणार आहे.
आमिर खानने 'लाल सिंग चढ्ढा' चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगला अद्याप सुरूवात झाली नाही. मात्र, एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.