महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अ‍ॅमेझॉनच्या ‘द फॅमिली मॅन’ सिरीजचे रिलीज पुन्हा लांबणीवर - अभिनेता मनोज बाजपेयी

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला उशीर झाला असल्याचे चित्रपट निर्माते राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी जाहीर केले. "द फॅमिली मॅन" च्या निर्मात्यांनी अद्याप दुसऱ्या सत्रातील अधिकृत ट्रेलर रिलीज केलेला नाही.

The Family Man'
द फॅमिली मॅन

By

Published : Feb 5, 2021, 4:58 PM IST

मुंबई- चित्रपट निर्माते जोडी राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी शुक्रवारी जाहीर केले की अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या गाजलेल्या ‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सिझनला उशीर झाला आहे.

या हेरगिरी नाट्याचा दुसरा सिझन १२ फेब्रुवारीला स्ट्रिमिंग होणार असल्याचे यापूर्वी निर्मात्यांनी जाहीर केले होते.

इंस्टाग्रामवर दिलेल्या निवेदनात निर्मात्यांनी सांगितले की, वेब सिरीजचा दुसरा सिझन उन्हाळ्यामध्ये रिलीज होऊ शकेल.

"आम्हाला माहित आहे की, आपण '' फॅमिली मॅन '' च्या नवीन हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहात. आम्ही सर्वजण तुमच्या प्रेमासाठी खरोखर आभारी आहोत आणि विनम्र आहोत!" असे एका निवेदनात म्हटले आहे.

"आमच्याकडे आपल्यासाठी एक अपडेट आहे. या उन्हाळ्यात फॅमिली मॅन सीझन 2 चा प्रीमियर या अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होईल! आम्ही आपल्याला हा उत्तम सिझन मिळवा यासाठी खूप प्रयत्न करीत आहोत. आणि आम्हाला खात्री आहे की आपल्याला ते आवडेल. थोडी प्रतीक्षा करा! " असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

या कार्यक्रमाच्या जवळच्या एका सूत्रांनी याआधी सांगितले होते की तांडव आणि मिर्झापूर या वेब सिरीजमध्ये झालेल्या वादग्रस्त गोष्टींमुळे हा सिझन लांबणीवर पडला आहे.

फॅमिली मॅन'- सीझन २' मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत पुनरागमन करण्यास तयार आहे. यामध्ये दक्षिण भारतीय स्टार अभिनेत्री सामन्था अक्केनेनी हिने डिजिटल पदार्पण केले आहे. या वेब सिरीजमध्ये मनोज बाजपेयी, प्रियामणि, शरिब हाश्मी, दर्शन कुमार, शरद केळकर आणि श्रेया धनवंतरी या कलाकारांसोबत सामन्था महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

हेही वाचा - 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये शक्तीशाली भूमिकेत झळकणार अजय देवगण

ABOUT THE AUTHOR

...view details