मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाचं दुसरं गाणं 'अज्ज सिंग गरजेगा' हे प्रदर्शित करण्यात आले आहे. शौर्य, हौतात्म्य यांचे प्रतिक म्हणजे 'केसरी'. याचीच झलक या गाण्यात पाहायला मिळते.
अक्षय कुमारच्या 'केसरी'चं 'अज्ज सिंग गरजेगा' गाणं प्रदर्शित! - kesari
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाचं दुसरं गाणं 'अज्ज सिंग गरजेगा' हे प्रदर्शित करण्यात आले आहे. शौर्य, हौतात्म्य यांचे प्रतिक म्हणजे 'केसरी'. याचीच झलक या गाण्यात पाहायला मिळते.
'केसरी' चित्रपटात त्या २१ शीख सैनिकांची कथा दाखविण्यात येणार आहे, ज्यांनी हार पत्कारण्यापेक्षा लढून मृत्यूस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. या २१ सैनिकांनी सुमारे १० हजार अफगाणांसोबत लढाई केली. अक्षय कुमार या चित्रपटात या २१ सैनिकांचे धाडसाने नेतृत्व करताना दिसणार आहे.