मुंबई - आजकाल डिजीटल विश्वाचे महत्व वाढताना दिसत आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी डिजीटल विश्वात पदार्पण केले आहे. यामध्ये आता अक्षय कुमारचाही समावेश झाला आहे. अॅमेझॉन प्राईमच्या 'द एंड' या वेबसीरिजमध्ये तो झळकणार आहे. मात्र, आपल्या या पहिल्या वहिल्या वेबसीरिजसाठी खिलाडी कुमारने बक्कळ मानधन घेतले आहे.
अक्षय कुमारची डिजीटल विश्वात एन्ट्री, पहिल्याच वेबसीरिजसाठी घेतले इतके मानधन! - the end
आजकाल डिजीटल विश्वाचे महत्व वाढताना दिसत आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी डिजीटल विश्वात पदार्पण केले आहे. यामध्ये आता अक्षय कुमारचाही समावेश झाला आहे. अॅमेझॉन प्राईमच्या 'द एंड' या वेबसीरिजमध्ये तो झळकणार आहे. मात्र, आपल्या या पहिल्या वहिल्या वेबसीरिजसाठी खिलाडी कुमारने बक्कळ मानधन घेतले आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमारने त्याच्या अटींवर या वेबसीरिजमध्ये काम करण्यासाठी होकार दिला आहे. त्याच्या मागणीप्रमाणेच त्याला मानधनही मिळणार आहे. 'द एंड'मध्ये भूमिका साकारण्यासाठी त्याने तब्बल ९० कोटी रुपये घेतले असल्याचे वृत्त आहे.
'द एंड' ही वेबसीरिज ही अॅक्शन, ड्रामा आणि थ्रिलरने परिपूर्ण असल्याचे अक्षयने सांगितले आहे. डिजीटल विश्वाचे वाढते महत्व आणि तरुणाईचा असलेला प्रतिसाद यामुळे मी यामध्ये एन्ट्री घेण्याचे ठरविले, असेही त्याने सांगितले. तसेच, डिजीटल विश्वात येण्याचा निर्णय मी माझ्या मुलामुळे घेतलाय', असेही तो म्हणाला.