मुंबई -कोरोना विषाणूमुळे देशात सध्या संपूर्ण जनता भीतीच्या दहशतीखाली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा कठीण परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स, नर्स आणि संपूर्ण वैद्यकिय कर्मचारी रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांनाही या कोरोना विषाणूची शिकार व्हावे लागत आहे. दरम्यान काही डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले. त्यांच्याशी करण्यात आलेल्या या गैरवर्तणूक प्रकरणी अभिनेता अजय देवगणने ट्विटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.
सुशिक्षित लोकांनी डॉक्टरांशी असा व्यवहार करणं हे खूप घृणास्पद आहे. असे असंवेदनशील लोक खरे गुन्हेगार असतात, असे अजयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.