महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अजय देवगनच्या 'दे दे प्यार दे' चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित - de de pyar de

अजय देवगन आणि तब्बू 'गोलमाल अगेन'नंतर पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.

'दे दे प्यार दे' चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित

By

Published : Apr 2, 2019, 5:35 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगन बऱ्याच दिवसांनंतर रोमॅन्टिक अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. लवकरच त्याचा 'दे दे प्यार दे' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टरही पाहायला मिळाले होते. आता या चित्रपटाचा धमाल ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.


'दे दे प्यार दे' चित्रपटात अजय देवगनसोबत अभिनेत्री रकुल प्रित सिंग आणि तब्बु मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अजय देवगनच्या ५० व्या वाढदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय.या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ५० वर्षीय व्यक्ती २५ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडतो. त्याला तिच्याच वयाची मुलगी आणि एक मुलगादेखील असतो. तब्बू ही त्याची एक्स पत्नी दाखविण्यात आली आहे. तर, रकुल ही गर्लफ्रेन्डची भूमिका साकारत आहे. दोन स्त्रीयांच्यामध्ये फसलेल्या व्यक्तीची धमाल कथा या चित्रपटात पाहायला मिळणार, असे या ट्रेलरवरून दिसते.


अजय देवगन आणि तब्बू 'गोलमाल अगेन'नंतर पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अकिव अली यांनी केले आहे. तर निर्मिती लव रंजन, भूषण कुमार आणि अंकुर गर्ग यांची आहे.


अजय देवगनचा अलिकडेच 'टोटल धमाल' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले. या चित्रपटात त्याने विनोदी भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा तो रोमॅन्टिक-कॉमेडी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १७ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details