महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

काजोलसाठी अजय देवगनने लिहिला खास संदेश, पाहा फोटो - प्यार तो होना ही था

काजोल नेहमी तिच्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखली जाते. १९९९ साली तिने अजयसोबत लग्नगाठ बांधली होती.

काजोलसाठी अजय देवगनने लिहिला खास संदेश, पाहा फोटो

By

Published : Aug 5, 2019, 4:41 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस आहे. कलाविश्वासोबतच चाहत्यांनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या खास दिवशी अजय देवगननेही तिचा एक फोटो शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अजयने काजोलचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने लिहिलेय, 'वेक अप! तुला ब्यूटी स्लिपची अजुनतरी काहीच गरज नाही'.

काजालनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हाच फोटो शेअर केला आहे. तिने लिहिले होते, की 'मी जागीच आहे. बस आत्ताच समजले की युगची शाळा नाही. सगळीकडे सुट्टी आहे'.

काजोल नेहमी तिच्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखली जाते. १९९९ साली तिने अजयसोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांनीही 'इश्क', 'प्यार तो होना ही था' आणि 'दिल क्या करे' यांसारख्या चित्रपटात एकत्र भूमिका साकारली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details