मुंबई -बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची भूरळ पाडण्यासाठी 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सहभागी झाली आहे. फ्रान्सच्या 'फ्रेन्च रिवेरा' मध्ये 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'चा ७२ वा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या 'कान्स'मध्ये दीपिका पदुकोण, कंगना रनौत, हीना खान, प्रियांका चोप्रा यांच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले. आता चाहत्यांना ऐश्वर्याच्या लूकची आतुरता होती. अखेर तिचा लूक समोर आला आहे. नेहमीप्रमाणे तिने तिच्या ग्लॅमरस लूकने यंदाही 'कान्स'मध्ये एन्ट्री घेतली.
'कान्स'मध्ये दिसला ऐश्वर्या रायचा ग्लॅमरस लूक, पाहा फोटो
ऐश्वर्या राय तिची मुलगी आराध्या सोबत 'कान्स'च्या रेड कार्पेटवर उतरली. यावेळी तिच्या गोल्डन मर्मेड रेड गाऊनमध्ये ती अतिशय सुंदर दिसली. तिच्या ड्रेसव्यतिरीक्त तिने परिधान केलेली ज्वेलरीदेखील चर्चेचा विषय बनली.
ऐश्वर्या राय तिची मुलगी आराध्या सोबत 'कान्स'च्या रेड कार्पेटवर उतरली. यावेळी तिच्या गोल्डन मर्मेड रेड गाऊनमध्ये ती अतिशय सुंदर दिसली. तिच्या ड्रेसव्यतिरीक्त तिने परिधान केलेली ज्वेलरीदेखील चर्चेचा विषय बनली. तिचा हा लूक आतंरराष्ट्रीय डिझाईनर जीन लूईस याने डिझाईन केला होता. मेटॅलिक गोल्डन यलो गाऊनला वन ऑफ शोल्डनने बोल्ड लूक देण्यात आला होता. यावर ऐश्वर्याच्या साध्या मेकअपनेही तिचे सौंदर्य खुलून आले.
ऐश्वर्याचे हे 'कान्स'मध्ये सहभागी होण्याचे सलग १८ वे वर्ष आहे. २००२ साली तिने पहिल्यांदा 'कान्स'मध्ये सहभाग घेतला होता.