महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गायिका सावनी रवींद्रने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस - singer savni ravindra

सुलभा स्पेशल स्कुलच्या विद्यर्थ्यांसोबत वेळ घालवल्याच्या अनुभवाबद्दल सावनी सांगते, “खरं तर मी ह्या विद्यार्थ्यांना सरप्राइज द्यायला इथे आले होते. पण त्यांनी तर मलाच सरप्राइज केले. माझ्यासाठी त्यांनी गाणी गायली, डान्स केला. त्यांच्यातली निरागसता मला खूप भावली.

गायिका सावनी रवींद्रने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस

By

Published : Jul 22, 2019, 5:20 PM IST

मुंबई- सुमधूर आवाजाची गायिका सावनी रविंद्रचा आज वाढदिवस. संवेदनशील गायिका सावनी दरवर्षी आपला वाढदिवस फिल्म इंडस्ट्रीतल्या मित्र-मैत्रिणींसोबत साजरा करण्यापेक्षा सामाजिक सेवा करून साजरा करते. यंदाही आपला वाढदिवस सावनीने मुंबईतल्या भिन्नमती मुलांच्या ‘सुलभा स्पेशल स्कुल’मध्ये जाऊन साजरा केला.

चार वर्षांपूर्वी सावनीने मुंबईमध्ये कॅन्सरग्रस्त मुलांसोबत वाढदिवस साजरा केला होता. तर त्यांनतर तीन वर्ष ती पुण्यातल्या मातोश्री वृध्दाश्रमात जाऊन वाढदिवस साजरा करत होती. सावनी रविंद्र अशा वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्याबाबत सांगते, “फक्त पार्टी करून आणि गिफ्ट्स घेऊन वाढदिवस साजरा करणे, मला कधीच आवडले नाही. माझ्या वाढदिवशी कोणातरी गरजू व्यक्तिच्या चेहऱ्यावर हसु फुलवावे आणि त्या व्यक्तिला आवश्यक भेटवस्तू द्यावी, असे मला फार पुर्वी पासूनच वाटायचे आणि मग त्यातूनच मी वाढदिवस अशा वेगळ्या पद्धतीने दरवर्षी साजरा करयचा संकल्प सुरू केला. जो दरवर्षी मी पूर्णही करतेय, ह्याचा अर्थातच मला आनंद आहे.”

गायिका सावनी रवींद्रने विशेष मुलांसोबत साजरा केला वाढदिवस

सुलभा स्पेशल स्कुलच्या विद्यर्थ्यांसोबत वेळ घालवल्याच्या अनुभवाबद्दल सावनी सांगते, “खरं तर मी ह्या विद्यार्थ्यांना सरप्राइज द्यायला इथे आले होते. पण त्यांनी तर मलाच सरप्राइज केले. माझ्यासाठी त्यांनी गाणी गायली, डान्स केला. त्यांच्यातली निरागसता मला खूप भावली. त्यांचे निखळ हास्य माझ्या वाढदिवसाचा आनंद व्दिगुणीत करून गेलं. त्यांनी दिलेली उर्जा आता वर्षभर चांगलं काम करण्याची उमेद मला देत राहिल” असं तिनं म्हटलं.

ABOUT THE AUTHOR

...view details