मुंबई - अभिनेता अभिषेक बच्चनला कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिषेक चाहत्यांच्या संपर्कात आहे. अभिषेकने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून रुग्णालयामधील फोटो शेअर केला आहे.
अभिषेक बच्चनने शेअर केला रुग्णालयातील फोटो - मुंबईतील नानावटी रुग्णालय
अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या सोशल मीडिया खात्यावरून रुग्णालयामधील फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये हॉस्पिटलचा कॉरिडॉर आहे. या फोटोमध्ये अभिषेक किंवा अन्य कोणीही पाहायला मिळाले नाही. कॉरिडॉरमध्ये शांतता असल्याचे दिसत आहे, तर काही खोल्यांचे दरवाजे बंद आहेत. ‘सुरंग के आखिर में एक रौशनी’, असे कॅप्शन अभिषेकने या फोटोला दिले आहे.
दरम्यान, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्यालाही कोरोनाची लागण झाली होती. उपाचारानंतर त्या दोघींही बऱ्या झाल्या असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन निगेटिव्ह आहेत.