महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ही दिलरुबा 'हसीन'च नाही तर 'शातिर'ही आहे....!! - हसीन दिलसरुबामध्ये विक्रांत मस्से

प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा हसीन दिलरुबा हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट कसा आहे याबद्दल आमच्या प्रतिनिधीने तुमच्यासाठी बनवलेला हा खास रिव्ह्यू.. कलाकार - तापसी पन्नू, विक्रांत मस्से आणि हर्षवर्धन राणे दिग्दर्शक - विनील मॅथ्यू

Haseen Dilruba Film Review
हसीन दिलरुबा

By

Published : Jul 7, 2021, 3:56 PM IST

Updated : Jul 10, 2021, 12:49 PM IST

मुंबई - बॉलिवूडमधील काही निवडक वेब सिरीज आणि चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत पडद्याला खिळवून ठेवण्यास भाग पाडतात. अशाच काही चित्रपटांपैकीहा एक चित्रपट आहे. हसीन दिलरुबा हा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. शेवटपर्यंत या चित्रपटात काय होते याचा प्रेक्षकांना थांगपत्ता लागत नाही. यातच या चित्रपटाचे खरे यश सामावलेले आहे. आपल्याच पतीचा खून झालेला दाखवणारी विधवा बायको स्वत:चा निर्दोषपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करते.

काय आहे 'हसीन दिलरुबा'ची स्टोरी

राणी हे दोन शब्द लिहीलेला जळलेला हात.... या शॉटपासून चित्रपटाची सुरूवात होते. आणि मग सुरू होतो क्यायमॅक्स. हरिद्वारजवळील ज्वालापूर येथील राणी कश्यप (तापसी पन्नू) आणि रिशू सक्सेना (विक्रांत मेस्सी) ची ही गोष्ट. स्वभावाने साधा सरळ असलेला रिशू राणीला पाहण्यासाठी तिच्या घरी जातो. ब्युटी पार्लरचे काम करणारी सुंदर आणि तेवढीच बोलायला फटकळ असणारी राणी त्याला पहिल्या भेटीतच आवडते. पोराचे लग्न व्हावे यासाठी पाठी पडणाऱ्या आईचा विरोधाविरुध्द तो राणीशी लग्न करतो. हरिश्चद्रांचा अवतार असणारा रिशू तिच्यासमोर आल्यावर त्याच्या तोंडातून एकही शब्दच फुटत नाही. याच्या उलट हे लग्न तिच्या मनाविरुध्द झाल्याने ती या लग्नाशी आनंदी नसते. त्या दोघांचे वैवाहिक जीवनात रिशूचा भाऊ नील (हर्शवर्धन राणे) याची एंट्री होते. राणीच्या मनासारख्या टॉल, डार्क, हँडसमच्या फूटपट्टीत बसणाऱ्या नीलकडे ती आकर्षित होते. बायकोचे आपल्या भावाशी चाललेले अफेयर समजल्यावर तो राणीचे आतोनात हाल करतो. यात दोघ आपल्या नात्याला पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतात. आणि काही काळानंतर यांच्यातील प्रेम बहरते. काही कारणाने नील आणि रिशूमध्ये बाचाबाची होते. आणि घरात मोठा स्फोट होतो. त्यात रिसूचा मृत्यू होतो. यालाच समांतर पोलीस अधिकारी राणीच आपल्या नवऱ्याच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे सिद्ध करतो. रिशी आणि राणीच्या तोंडचे पुस्तक वाचतानाचे संवाद चांगले जमलेत.

या सर्वांत दिनेश पंडित नामक लेखकाची पुस्तके या कथेत महत्वाची भूमिका बजावतात. (तळटीप - दिनेश पंडित नामक हिंदी लेखक अस्तित्वात नाही. याचा शोध घेण्यास जाऊ नये.)

क्लास अभिनय

पत्नीच्या मृत्यूमध्ये वेडा झालेला मजनू आणि तेवढ्याच थंड डोक्याने तिच्यासाठी काहीही करणारा रिशू सक्सेना हे पात्र विक्रांत मेस्सीने सुंदर रंगवले आहे. तापसीचा अभिनय उत्तम. तिचा मेकअप, हेयर आणि ड्रेसिंग सेन्स कुठेही लाऊड वाटत नाही. पती गेल्यानंतरची विधवा पत्नी, पोलीसांकडे चौकशीसाठी जाताना चेहऱ्यावरील भाव तर लाजबावच. मात्र यातही हर्षवर्धन राणे आणि रिशूची आई दाखवलेली यामिनी दास छोट्या भूमिकेत भाव खाऊन जातात. सीआयडी फेम पोलीस अधिकारी झालेले आदित्य श्रीवास्तव टाईपकास्ट झाले आहेत.

दिग्दर्शन आणि पटकथा

विनील मॅथ्यू या दिग्दर्शकाचा हा दुसरा चित्रपट. २०१४ मध्ये त्याने हसी तोफसी हा चित्रपट बनवला होता. तो एक कल्पक दिग्दर्शक आहे. या चित्रपटात त्याला कनिका धिल्लनच्या पटकथेने खूप चांगली साथ दिली आहे. अखेरपर्यंत उत्सुकता टिकवण्यात आणि उत्कंठा वाढवण्यात दोघेही यशस्वी झालेत.

संगीत

चित्रपटाचे संगीत प्रसंगांना साजेसे. कुठेही संगीत मुद्दामून घुसडल्यासारखे वाटत नाही. या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत.

सिनेमॅटोग्राफ

टॉलीवूडमधील प्रसिध्द सिनेमॅटोग्राफर जयकृष्णा गुम्माडी यांनी याची सिनेमॅटोग्राफी केली आहे. घराशेजारील नदी, उत्तरेतील टीपीकल लूक त्यांनी आपल्या कॅमेऱ्यानी मस्त टिपला आहे.

Last Updated : Jul 10, 2021, 12:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details