महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रणवीर सिंगच्या 'गली बॉय'चा सिक्वेलही होणार प्रदर्शित, झोया अख्तरने केला खुलासा - रणवीर सिंग

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा 'गली बॉय' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वीदेखील ठरला. लवकरच या चित्रपटाच्या सिक्वेलही तयार करण्यात येणार आहे. दिगदर्शिका झोया अख्तर यांनीच याबाबत खुलासा केला आहे.

गली बॉय

By

Published : Mar 10, 2019, 6:30 PM IST

मुंबई - रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा 'गली बॉय' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वीदेखील ठरला. लवकरच या चित्रपटाच्या सिक्वेलही तयार करण्यात येणार आहे. दिगदर्शिका झोया अख्तर यांनीच याबाबत खुलासा केला आहे.

'गली बॉय' चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर १०० कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटाने चित्रपट समीक्षक तसेच प्रेक्षकांची मने जिंकली. बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही या चित्रपटाचा प्रिमिअर आयोजित करण्यात आला होता. या चित्रपटातील रणवीरचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.


एका माध्यमाशी बोलताना झोया अख्तर यांनी 'गली बॉय'चा सिक्वेल तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या सिक्वेलच्या स्क्रिप्टवर काम करणे सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
'गली बॉय'च्या सिक्वेलची कथा काय असणार, यात रणवीर-आलियाच झळकणार का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र, या चित्रपटाची लोकप्रियता आणि अशा कलाकारांना प्रकाशझोतात आणण्याच्या उद्देशानेच आणखी पावले उचलली जाणार असल्याचे झोया अख्तर यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details